वैशाली

वैशाली
October 29, 2020
    

साप्ताहिक बाजारात भाजी विकणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीकडून मला माणदेशी महिला सहकारी बँकेच्या कॅश क्रेडीट सुविधेची माहिती मिळाली. मी स्वतः माहिती शोधली तेव्हा लक्षात आले की कडधान्ये विकून पैसे कमावता येतील. पाच वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा ₹ २०,००० इतके कर्ज घेतले. तेव्हापासून मी ₹ ४ लाख इतकी रक्कम कर्जाऊ घेतली आहे आणि त्याची परतफेड केली आहे. मी सुरुवातीला गोंधवळ्याच्या बाजारात कडधान्ये विकण्यापासून सुरुवात केली आणि सध्या मी आणखी सहा साप्ताहिक बाजारांमध्ये विक्री करते.